एन. डी. पाटील शुगर्स ३३०० रुपये दर देणार

इस्लामपूर , एन. डी. पाटील. शुगर्स सन २०२५ – २६ च्या हंगामाच्या ऊसास विना कपात ३३०० रुपये दर देऊन पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती एन. डी. पाटील शुगर्सचे चेअरमन दत्ताजीराव पाटील व केदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 वाघवाडी (ता. वाळवा) येथील शकुंतला नगर कारखाना स्थळावर कारखाना बॉयलर प्रदीपन समारंभ झाला. २२ सप्टेंबरला सकाळी १० वाजता शकुंतला पाटील यांच्या हस्ते मोळी पूजन करून गळीत हंगामास प्रारंभ होणार आहे. काटकरसर व पारदर्शकता या तत्वावर कारखान्याची वाटचाल राहील. या प्रकल्पात ऊस गाळप व गुळ पावडर याचे उत्पादन केले जाणार आहे. प्रतिदिनी २५०० टन ऊस गाळप असलेला कारखाना आहे. या हंगामात जे शेतकरी ऊस पुरवठा करतील त्यांच्या उसाला एकरकमी कोणतीही कपात न करता ३३०० रुपये दर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासूनच कारखाना चालवला जाईल . या प्रकल्पाबरोबर सहविजनिर्मिती प्रकल्प ही आहे. या उद्योगबरोबर डिस्टलरी या प्रकल्पाची परवानगी मिळाली आहे. तो ही प्रकल्प चालू होईल. संपूर्ण ऑटोमायझेशन असलेल्या या प्रकल्पाला अत्यंत काटकसरीने चालवण्याचा मानस असून शेतकऱ्यांचे हित जोपासायचे म्हणून एक रकमी प्रति टन ३३०० रुपये दर देणार आहे. आमची कोणाबरोबर स्पर्धा नाही. यावेळी निलिंद पाटील, धनंजय पाटील, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.