पाणंद रस्त्याची कामे डिजिटलमय होणार

आटपाडी , तालुक्यातील शेतशिवार रस्त्यामधून शेतकऱ्यांची रोजची भांडणे होत असल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील सेवा पंधरवडा चालू आहे. आटपाडीचे तहसीलदार शीतल बंडगर यांनी पुण्याच्या डी-लॉजिक टेक्नॉलॉजीच्या साह्याने या पाणंद रस्त्याचे काम ई – मामलेदार कोर्ट ॲप्लिकेशनद्वारे अगदी सहजपणे होण्यासाठी या ॲपच्या क्यूआर कोडची संकल्पना प्रत्यक्षात राबवली आहे. या ॲपचे उदघाटन आमदार सुहास बाबर यांच्याहस्ते सुहास बाबर यांच्याहस्ते नुकतेच झाले.

यासंदर्भातल्या क्यूआर कोड सॉफ्टवेअरची संकल्पना पुण्याच्या डी-लॉजिक टेकनॉलॉजीचे मालक नवीनकुमार दादासाहेब डिसले यांनी तहसीलदार शीतल बंडगर यांच्या लक्षात आणून दिली. मोबाईलवरच ‘ई – मामलेदार कोर्ट ॲपद्वारे सदरची कामे सहजपणे करता येणार आहेत आणि हे ॲप गावागावातल्या शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी नवीन कुमार डिसले स्वतः आटपाडी तालुक्याच्या प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना सांगणार आहेत. ते या कंपनीचे मालक आहेत. ग्रामपंचायतीच्या ग्रामकर ॲप मधूनही त्यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतीचा कारभार गावकऱ्यांच्या हातातल्या मोबाईलवर आणलेला आहे. आटपाडी तालुक्यातील चार- पाच ग्रामपंचायती या ॲपचा वापर सध्या करीत आहेत.