बीड शहरात यश देवेंद्र ढाका या तरुणाची काल रात्री हत्या करण्यात आली. या हत्येमागचं कारण मित्रासोबत वाढदिवस साजरा करताना वाद झाला वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झालं आणि त्यातूनच यशचा मित्र सुरज काटे याने धारदार शस्त्राने वर्दळीच्या ठिकाणी पोटात चाकू खुपसवून यशचा खून केला. महिन्याभरापूर्वी यश आणि सुरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले. त्यामुळे त्यांच्यात वैमानस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचे कारण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केलीये. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.
यश हा 22 वर्षाचा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा हादरले असून या घटनेने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करत आहे. यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे. दरम्यान या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात काल (गुरुवारी, ता २५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यश देवेंद्र ढाका (वय २२, रा. बीड) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली आहे. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनीअरिंगचे) शिक्षण घेत होता. वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
यश आणि सूरज या दोघांमध्ये साधारण एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते, त्यामुळे त्यांच्यात खुन्नस (वैर) होती. गुरुवारी रात्रीही माने कॉम्प्लेक्स परिसरात त्यांच्यात वाद झाले. यावेळी सूरजने सोबत असलेला चाकू काढून थेट यशच्या छातीत खुपसला. यात रक्तबंबाळ होऊन यश खाली कोसळला होता. त्यानंतर यशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तर सूरज हा फरार झाला होता.
