महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचे निधन

अभिनेता दिग्दर्शक, लेखक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचं दीपा मेहता यांचं 25 सप्टेंबर रोजी निधन झालं आहे. महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांची दोन मुलं आहे. सत्या आणि अश्वमी. सत्या मांजरेकरने आपल्या आईच्या निधनावर भावुक पोस्ट लिहिली आहे. दीपा मेहता या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझाइनर होत्या.

दीपा मेहता आणि महेश मांजरेकर यांचं 1987 साली लग्न झालं होतं. दोघंही कॉलेजपासून एकमेकांचे मित्र होते. या दोघांनी या मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि मग लग्नात झालं.मात्र लग्नानंतर, मुलांच्या जन्मानंतर महेश मांजरेकर आणि दीपा यांच्याच खटके उडू लागले आणि काही वर्षातच त्यांचा संसार मोडला.

घटस्फोटानंतर महेश मांजरेकरांनी मेधा यांच्याशी लग्न केलं. महेश मांजरेकर आणि मेधा यांना सई ही मुलगी आहे. काही वर्षांपासून दीपा एकट्याच राहत होत्या. त्यांचा ‘क्वीन ऑफ हार्ट्स ‘ हा साड्यांचा ब्रँड चालवत होत्या. त्यांच्या लेकीने अश्वमी या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत होती.

सत्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, I miss you mumma…असं म्हणत त्याने दीपा मेहता यांचे फोटो पोस्ट केले आहेत. सत्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. अनेकांनी दीपा मेहता यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. अंकीता वालावलकरने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.