हातकणंगले तालुक्यातील कोरोची हे गाव इचलकरंजी शहरालगत असून, गेल्या काही वर्षात शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगतीसाठी ओळखले जाते. श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेने पंचक्रोशीत शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी प्रदीप पाटील यांनी २०१८-१९ साली कोरोची येथे केअर हॉस्पिटलची स्थापना करून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची नवी दिशा दाखवली.
डॉ. पाटील यांचा वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि जनसामान्यांविषयीची संवेदनशीलता यामुळे हे हॉस्पिटल आज १०० खाटांचे बहुविभागीय आरोग्य केंद्र बनले आहे.. येथे २४ तास सेवा उपलब्ध असून सर्वसामान्य रुग्णांसाठी हा दवाखाना एक विश्वासार्ह ठिकाण ठरले आहे. या हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे, दंत, मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थिरोग, पोटाच्या शस्त्रक्रिया, युरोलॉजी, सोनोग्राफी व एक्स-रे, रक्त तपासणी यासारखे अनेक विभाग कार्यरत आहेत. डोळे विभागात मोतीबिंदू, काचबिंदू ते रेटिनाच्या शस्त्रक्रियेसारख्या सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. दंत विभागात दात स्वच्छ करणे, तुटलेले दात दुरुस्त करणे, एक्स-रे व कवळी बसवणे अशा सेवा दिल्या जातात. मेडिसिन विभागात मधुमेह, हृदयविकार, फुप्फुस विकार, थायरॉईड, त्वचा आजार, अॅलर्जी यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळते.
स्त्री व बाळंतपण विभागात नॉर्मल व सिझेरिअन डिलिव्हरी, वंध्यत्व उपचार, गर्भाशय ऑपरेशन अशा सेवा आहेत. अस्थिरोग विभागात हाडांचे फ्रक्चर, मणक्याची शस्त्रक्रिया, लिगामेंट दुरुस्ती, फिजिओथेरपीसह आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. तसेच अपेंडिक्स, पित्ताशय, टॉन्सिल्स, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया यांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग आहे. युरोलॉजी विभागात मूतखडा, प्रोस्टेट, किडनी कॅन्सर यांचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केले जाते. सोनोग्राफी व एक्स-रे विभागात ३डी / ४ डी डॉपलर, गरोदरपणातील तपासणी, डिजिटल एक्स-रे यांची सुविधा आहे. रक्त तपासणी प्रयोगशाळेत डेंग्यू, टायफॉईड, मलेरिया ते ट्रिपल मार्करपर्यंत तपासण्या होतात.
आयुर्वेदावर आधारित पंचकर्म विभाग हा हॉस्पिटलचा एक महत्त्वाचा भाग आहे. मधुमेह, आम्लपित्त, संधिवात, वजनवाढ, त्वचारोग,जुनाट आजारांवर आयुर्वेदिक चिकित्सा केली जाते. याशिवाय अत्याधुनिक आयसीयू व एनआयसीयू विभाग, व्हेंटिलेटर, डिफेब्रिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, नवजात शिशूंसाठी एनआयसीयू पेटी अशी आधुनिक साधनसामग्री उपलब्ध आहे. डायलिसिससह अनेक जटिल उपचार येथे केले जातात.
,
विशेष म्हणजे, हे हॉस्पिटल गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत, ईएसआयसी, विश्वकर्मा बांधकाम कामगार योजना अशा शासकीय योजनांतर्गत मोफत उपचार मिळतात. आतापर्यंत हजारो रुग्णांनी या योजनांचा लाभ घेतला असून अनेक ऑपरेशन्स यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. केअर हॉस्पिटल हे केवळ एक दवाखाना नसून समाजसेवेचे केंद्र बनले आहे. ग्रामीण जनतेसाठी सर्व प्रकारच्या उपचारांची सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
डॉ. शुभांगी पाटील यांच्या पुढाकारामुळे कोरोचीसह पंचक्रोशीतील लोकांना आता उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत नाही. त्यांचा दूरदृष्टीचा विचार आणि आरोग्य सेवेतला अनुभव यामुळे केअर हॉस्पिटल आज विश्वास सेवा आणि गुणवत्तेचे प्रतिक बनले आहे.
