हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात पारितोषिक समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या परिश्रमाची जाणीव ठेवून शिक्षणात ध्येय बाळगावे .तसेच मानवी मूल्यांचे जतन करावे ,असे प्रतिपादन व्याख्यान वसंत हंकारे यांनी केले

हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र डांगे होते प्राचार्य डॉक्टर योजना जोगाळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले राजेंद्र डांगे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे वसंत हंकारे यांचा सत्कार करण्यात आला.