सांगोला तहसील कार्यालयातील पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा भ्रष्ट वाळू माफिया कंत्राटी कर्मचाऱ्यांची चौकशी तहसीलदार करतील का? प्रश्न सांगोला तालुक्यातील जनतेतून होत आहे.
सांगोला तालुक्यातील शेतकरी पेन्शन योजनेचा खाजगी वाळू माफिया सुनील खळगी आपल्या स्वतःच्या लालसे पोटी हम करे सो कायद्याप्रमाणे वागत आहे. यांच्याकडे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कळसे यांनी पुरेपूर लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
मागील वर्षभरापूर्वी मागील तहसीलदाराना याच खाजगी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अनेक बोगस असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे पेन्शन जमा करण्याची वेळ देखील आलेली होती. सदरचा कर्मचारी महा-ई-सेवा केंद्र चालकांना तहसीलदारांचा अधिकृत पासवर्ड देऊन त्याने पैसे कमावल्याची चर्चा देखील होत आहे.
जेव्हा ही गोष्ट तहसीलदारांच्या लक्षात आली त्यावेळेस हा कर्मचारी हात झटकून रिकामा झाला. आता हाच पुन्हा कर्मचारी जे शेतकरी पैसे देत आहेत त्यांचेच काम करत आहे. अनेक दुरुस्तीच्या कामासाठी देखील पैसे घेत असल्याचे बोलले जात आहे.
तसेच नवीन खाते उघडण्यासाठी देखील मोठी रक्कम हा कर्मचारी घेत असल्याचं सांगोला तालुक्यातील पेन्शन धार शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे तहसीलदार संतोष कणसे यांनी पुरेपूर या कर्मचाऱ्याकडे लक्ष घालून त्याची हकालपट्टी करण्याची मागणी सांगोला तालुक्यातील जनतेतून जोर धरू लागली आहे.