भेंडवडेत दोन गटांत हाणामारी; ८ जखमी

भेंडवडे येथे राजकीय वैमनस्यातून राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने गट विरुद्ध अमोल निकम व बालाजी निकम गटात शुक्रवारी जोरदार धुमश्चक्री झाली. यात दोन्ही गटांतील आठजण गंभीर जखमी झाले आहेत. एक मोपेड पेटविण्यात आली असून, एका दुचाकीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंद झाली नव्हती. दरम्यान, भेंडवडे गावात तणावपूर्ण शांतता आहे.

माने गटाचे दशरथ देसाई, आसिफ पठाण, राजवर्धन माने, ऋषीकेश कोळी हे चारजण गंभीर जखमी, तर नितीन
रोकडे व अमोल एडके हे दोघे किरकोळ जखमी आहेत. निकम गटाचे संतोष बाळासो निकम व बालाजी विठ्ठलराव निकम, असे एकूण आठजण जखमी आहेत.