दसरा हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण असून यादिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता. हिंदू पंचांगानुसार आश्विन शुक्ल दशमीचा हा दिवस होता. या तिथीला विजयादशमी असंही म्हटलं जातं. यादिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा केली जाते. दसरा हा चार मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. हा दिवस सर्व कामांसाठी शुभ मानला जातो. दसरा हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पूर्वीच्या काळी हा सण कृषीमहोत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा होती. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे घटाजवळ धान्याची पेरणी केली जाते. तयार झालेले धान्याचे तण देवास वाहणे. सीमोल्लंघनाला जातांना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे. पुढे या सणाला धार्मिक रूप आले, पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला गेला आहे. यादिवशी शस्त्रपूजा करण्याची पंरपरा सुरु झाली. दसऱ्याला पूजा कशी करायची, शुभ मुहूर्त काय, महत्त्व जाणून घ्या.या दिवशी शुभ कार्य, गृह प्रवेश, वाहन खरेदी आणि सोनं खरेदी करण्यात येते. दसऱ्याला सोने खरेदी शुभ मानली जाते.
दसरा 2025 शुभ योग !
या विजयादशमीला, रवि योग, नवपंचम योग, सुकर्मा, धृती आणि केंद्र योग असे अनेक शुभ संयोग तयार होत आहेत, जे पूजा, नवीन उपक्रम सुरू करणे आणि रावण दहन यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. या योगांमध्ये केलेले कार्य चिरस्थायी आणि फलदायी असते.
दसऱ्याला शस्त्र पूजा का करतात?
षोडश मातृकामध्ये सहाव्या क्रमात जी देवी येते तिचं नाव विजया आहे. जगतजननी मत भवानीच्या दोन सखींचे (मैत्रिणी) नाव जया-विजया आहे. यामधील एकीच्या नावावर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. हा सण शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे तसंच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
या दिवशी हे सर्वजण आपापल्या शस्त्रांची पूजा करतात, कारण हे शस्त्र प्राणांची रक्षा करतात तसंच भरण पोषणाचे साधनही आहेत. या अस्त्रांमध्ये विजय देवीचा वास मानून यांची पूजा केली जाते. सर्वात पहिले शस्त्रांवर पाणी शिंपडून पवित्र केलं जातं. त्यानंतर महाकाली स्तोत्राचे पाठ करून शस्त्रांवर हळद, कुंकू, फुल अर्पण करून धूप-दीप दाखवून पूजा केली जाते.
दसरा 2025 पूजाविधी
एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचा कपडा परिधान करा. बाजूला छान रांगोळी काढा. त्यानंतर एका पाटीवर किंवा कागदावर सरस्वती पूजनासाठी सरस्वती यंत्र काढा. लक्ष्मी देवीचा फोटा किंवा मूर्ती आणि कलश स्थापना करा. गपणपती म्हणून सुपारी ठेवा. त्यासोबत देवांचे पुस्तकसह अभ्यासाची वही पुस्तक आणि पेनसोबत शस्त्र म्हणून कात्री, पाना, पिनचिस वैगेरे ठेवा. त्यांची हळदकुंकू वाहून पुजा करा. त्यानंतर आपट्याचा पानांची पूजा करा. पाच फळं ठेवा. आता आपट्याची पानं अर्पण करा. देवा आणि अगबत्ती लावून नमस्कार करा.
