खंडेनवमी व विजयादशमीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी शहरातील मुख्य रस्त्यासह विविध चौकांमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. सायंकाळनंतर रस्ते गर्दीने फुलून गेले होते. उद्या गुरूवार ता. २ रोजी विजयादशमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात साजरी केली जाते. गेल्या दहा दिवसांपासून इचलकरंजी शहरात नवरात्र उत्सवामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गेल्या १० दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.बुधवारी खंडेनवमीनिमित्त फुले, ऊस व पुजेचे साहित्य खरेदीसाठी मुख्य रस्त्यावर तसेच विविध चौकात गर्दी दिसून येत होती.
त्याचबरोबर ११ व्या दिवशी विजयादशमीचा सण आला आहे. विजयादशमीच्या पुजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीसाठी महिलांची तसेच नागरिकांची बाजारपेठेत लगबग दिसूत होती.
