हातकणंगले मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग…..

बहुचर्चित हातकणंगले मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी खासदार राजू शेट्टीच्या विरोधात कोण? ही चर्चाही रंगली आहे.

मात्र, उमेदवार निश्चित झाल्यानंतरच निकालाची गणिते ठरणार असून, जातीय समीकरणेही निर्णायक ठरणार आहेत. आचार संहिता लागू झाली असली तरीही अद्याप उमेदवारीचा घोळ कायमच आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरूच आहे . उमेदवारी निश्चित नसल्याने कार्यकर्त्यांची घालमेल दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे निवडणूक दुरंगी होणारी की तिरंगी याबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे.

राजू शेट्टी आणि धैर्यशील माने या दोघांत दुरंगी लढत झाली तर दोघांनाही समान संधी असल्याचे चित्र आजतरी आहे. मात्र तिरंगी लढत झालीच तर मग तिसरा उमेदवार कोण? आणि महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिलाच तर राजू शेट्टी यांची भूमिका ‘एकला चलो रे’ची राहणार का आणि तिरंगी लढतीचा फटका कोणाला बसणार याची चर्चा रंगू लागली आहे.