IPS अधिकारी असल्याचं सांगत पुण्यात मायलेकीने रचला बनाव

पुण्यात फुकट चपलांसांठी मायलेकींचा प्रताप. आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून मायलेकी पैसे न देता चप्पल खरेदी करुन झाल्या पसार. पुण्यातील एमजी रोडवरील नामांकित चप्पल दुकानात ही घटना घडल्याचं वृत्त. गुन्ह्याच्या नोंदीनंतर लष्कर पोलिसांनी मायलेंकींना ठोकल्या बेड्या. कामगाराला ‘पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल’ म्हणत दोघींनी काढला होता पळ.

बनावट ओळखपत्र दाखवून, घरात लग्नाचा कार्यक्रम असल्याचं सांगून एमजी रोडवरील एका नामांकित दुकानातून चप्पल खरेदी केल्यानंतर पैसे न देता त्यांनी मायलेकी निघून गेल्या.

आरोपी महिलांनी रचला भलताच कट…
13 सप्टेंबर रोजी सायंकाळी आरोपी महिला मिनाज मुर्तजा शेख (वय 40), आणि तिची मुलगी रिबा मुर्तजा शेख (वय. 19) या दुकानात आल्या. मिनाजनं आपण आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून बनावट ओळखपत्र दाखविलं. ज्यानंतर लग्नाचा कार्यक्रम असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल, बुट खरेदी करून कामगाराला ‘पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल’ असं सांगितलं. मात्र पैसे न देता तब्बल 17000 माल घेऊन दोघी पसार झाल्या.

दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनंतर एम. जी. रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींचा ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागला. अखेर 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी या दोघींना अटक करण्यात आली. आरोपी महिला मिनाज आणि तिची मुलगी रिबा या दोघींविरोधात यापूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर.

पुण्यातील चप्पल चोरी प्रकरणात नेमकं काय घडलं?
पुण्याच्या एमजी रोडवरील एका नामांकित चप्पल दुकानात 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी मायलेकींनी आयपीएस अधिकारी असल्याचा बनाव करून बनावट ओळखपत्र दाखवलं.

आरोपींवर यापूर्वी काय गुन्हे दाखल आहेत?
मिनाज आणि रिबा यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. ही घटना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीशी जुळणारी असल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.