मुंबईनंतर आता शहराच्या वेशीवर असलेल्या ठाणे शहराचाही झपाट्याने विकास होतोय. अलीकडेच ठाणे शहरात मेट्रो धावली लवकरच मेट्रोच्या फेऱ्यादेखील सुरू होती. इतकंच नव्हे तर समृद्धी महामार्गाची सुरुवातदेखील ठाण्यातील आमने येथे होत आहे. याच आमने येथे ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. या ग्रोथ सेंटरमध्ये नव्याने 130 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. अलीकडेच राज्य सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
आमने ग्रोथ सेंटरमध्ये एकूण 176 गावांचा समावेश आहे. 483 चौरस किमी क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे.
राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील 46 गावांसाठी सप्टेंबर 2024मध्ये एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी 109 चौरस किमी क्षेत्रासाठी एमएसआरडीसीची नियु्ती करण्यात आली होती. आता यात अनगाव सापे विकास केंद्रातील 130 गावांच्या 374 चौ किमी क्षेत्राचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
भिवंडी 148 व कल्याणमधील 28 गावांसाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट, बीकेसी, सीप्झसारखेच हे महत्त्वाकांक्षी ग्रोथ सेंटर असणार आहे. भिवंडीतील 148 व कल्याणमधील 28 गावांसाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करेल.
आमने भागातील 176 गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ग्रोथ सेंटरमध्ये इंडस्ट्रिअल पार्क, लॉजिस्टिक हब, टेक्सटाइल पार्क, फार्मा अँड बायटेक पार्क, फुड प्रोसेसिंग पार्क, इनोव्हेशन पार्क, मेडिसिटी, स्पोर्ट्स अँड रिक्रीएशन हब, हेल्थकेअर क्लस्टर, अॅग्रीकल्चर हब, होलसेल ट्रेड सेंटर यांचा समावेश असेल. इतकंच नव्हे तर रहिवासी आणि व्यावसायिक इमारती, थिम बेस पार्क यांचाही समावेश असेल. त्याचबरोबर या भागाचा ट्रान्सिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पद्धतीने विकास साधला जाणार आहे.
