स्व. भाई . गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानावर रॅलीदरम्यान अज्ञात इसमांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज ११ ऑक्टोबर रोजी सांगोला बंदची हाक देण्यात आली. असून सकाळी ९ वाजता निषेध मोर्चाही काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाकडून तालुका चिटणीस दादासाहेब बाबर यांनी दिली. याबाबतचे निवेदन तहसीलदार संतोष कणसे व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना देण्यात आली.
स्व. भाई . गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानावर रॅलीदरम्यान अज्ञात इसमांनी भ्याड हल्ला केला. अज्ञात हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी, या निषेधार्थ आज शनिवारी दि. ११ ऑक्टोबर रोजी सांगोला बंदची हाक देण्यात आली असून सकाळी ९ वाजलेपासून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
निवेदन देते प्रसंगी समाधान पाटील, समाधान पवार, निलेश अनुसे, बालाजी येडगे, आकाश येडगे,संजय डोईफोडे,आकाश व्हटे , नवनाथ शिंगाडे, शाहरुख तांबोळी, प्रविण बनसोडे, दामाजी मोरे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
