आटपाडी पंचायत समिती सदस्य आरक्षणाची सोडत सोमवारी

आटपाडी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्व्रभूमीवर पंचायत सामिती सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार , दि. १३ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात होणार असल्याची माहिती तहसीलदार शीतल बंडगर यांनी दिली.

२०१७ च्या सभागृहाची मुदत संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत . आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेनंतर जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीचे आठ गट कमी होऊन दिघंची,निंबवडे ,करगणी व खरसुंडी हे गट अस्तित्वात आले आहेत.
आटपाडी गण कमी होऊन विठलापूर, दिघंची, माडगुळे,करगणी, घरनिकी, निंबवडे , नेलकरंजी , खरसुंडी हे आठ पंचायत समिती गण अस्तित्वात आले आहेत.

आटपाडी पंचायत समितीचे सभापती पद खुले राहिले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये सदस्य पदासाठी कोणते आरक्षण निघणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सोमवार,दि. १३ रोजी आटपाडी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडत होणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील सर्व गणांतील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार शीतल बंडगर यांनी केले आहे.