धक्कादायक ! खडकवासला NDA मध्ये 18 वर्षीय कॅडेटनं संपवलं आयुष्य

पुण्यातील खडकवासला इथं असणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये धक्कादायक घटना घडली असून, अनेकांच्याच पायाखालजी जमीन सरकली आहे. देशसेवेसाठी सज्ज होऊ पाणाऱ्या आणि एनडीएमध्ये शैक्षणिक कारकिर्दीच्या प्रथम सत्रासाठी शिक्षण घेणाऱ्या 18 वर्षीय कॅडेटनं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

NDA मध्ये राहत्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं केली आत्महत्या केल्याचं वृत्त समोर येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंतरिक्ष कुमार सिंह असं या तरुणाचं नाव असून, त्याचं वय 18 वर्षे असल्याची माहिती समोर आली. हा तरूण मुळचा उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील रहिवासी असल्याची माहिती असून, त्याच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असल्याचं समजत आहे.

पत्र, चिठ्ठी किंवा तत्सम पुरावा ?
जुलै महिन्यात अंतरिक्षनं NDAमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, घटनास्थळावरून कोणत्याही प्रकारचं पत्र, चिठ्ठी किंवा तत्सम पुरावा सापडू न शकल्यानं आता आत्महत्येच्या कारणाची उकल करण्याचं आवाहन यंत्रणांपुढे आहे.

एनडीए प्रशासनानंही या घटनेची पुष्टी करत सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी अर्थात चौकशी समिती नेमल्याचं म्हटलं. तर, प्राथमिक स्वरुपात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी करत अंतरिक्षने पहाटेच्या वेळी त्याच्या खोलीतील बेडशीटने गळफास लावून आत्महत्या केली.

नेहमीच्या पहाटेच्या सत्रातील प्रशिक्षणासाठी तो हजर राहिला नसल्यानं त्याच्या सहकाऱ्यांनी केबिनपाशी जाऊन पाहिलं, तेव्हा तिथं तो गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. ज्यानंतर तातडीनं त्याला खडकवासला मिलिटरी रुग्णालयात नेम्यात आलं, मात्र तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनाही तात्काळ कळवण्यात आले, ज्यानंतर पोलिसांनीच अंतरिक्षच्या कुटुंबाला या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. अंतरिक्षच एका लष्करी सेवेतील कुटुंबातून आलेला मुलगा असल्यानं त्यानं इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं हाच प्रश्न आता सातत्यानं उपस्थित होत असून, पोलीसही याच्या उत्तराचा शोध घेत आहेत.