पेठवडगाव परिसरातील जनतेच्या हितासाठी व काळाची गरज ओळखून पेठवडगाव स्वतंत्र तालुका करावा, अशा मागणीचे निवेदन हातकणंगले येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अध्यक्ष गुलाबराव पोळ व उपाध्यक्ष प्रभाकर साळुंखे यांच्यासह सदस्यांनी दिले.पेठवडगाव तालुक्याचे स्वतंत्र ठिकाण झाल्यास विशेष करून सध्याच्या हातकणंगले तालुक्यातील पश्चिम व उत्तरेकडील गावांना प्रशासकीयदृष्ट्या सोयीचे व खर्चात बचत होणार आहे.
जनतेच्या हितासाठी स्वतंत्र वडगाव तालुका निर्माण करावा, अशीही मागणी निवेदनात केली आहे. समितीचे सदस्य खंडेराव मिरजकर, दिलीप शिंदे, राजाराम यादव, अनिल बुढ्ढे, संदीप पाटील, वसंत पन्हाळकर, नाना जाधव, नितीन दिंडे, शीतल कोळी आदी उपस्थित होते.