शिवतीर्थ ते गांधी पुतळा रस्त्याच्या मधोमध दिवाळी बाजार भरवता येणार नाही न्यायालयाचा निर्णय

इचलकरंजी शहरातील पन्नास वर्षापासून दिवाळीचा बाजार शिवतीर्थ ते गांधी पुतळा या ठिकाणी भरवला जात होता परंतु वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षेच्या दृष्टीने यंदा दिवाळी चा बाजार मुख्य बाजार रस्त्यावर न भरवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच च्या न्यायालयाने दिला निकाल .

शिवतीर्थ ते गांधी पुतळा रस्त्याच्या मधोमध कोणतेही स्टॉल , फेरीवाले , दुकानाबाहेर मंडप , भरवले जाणार नाहीत याची काळजी महापालिकेने घ्यावी असे सांगण्यात आले आहे . या निकालामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे . वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा दिवाळी चा बाजार मोकळ्या व प्रशस्त जागेत भरवण्यात यावा असा निर्णय देण्यात आला आहे.

तसेच ह्या दिवाळी बाजारामुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी महापालिका व पोलीस प्रशासनाने घ्यावी . प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी न्यायालयाने याचिका काढली ह्या न्यायालयाच्या याचिकेमुळे याचिका कर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.