दीनदयाळ सूतगिरणीच्या अध्यक्षपदी रमेश वडे ; शाकीदाबी शेख उपाध्यक्ष

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली . १८ संचालक पदांसाठी १८ उमेदवारांनीच नामनिर्देश अर्ज दाखल केल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जाहीर केले. संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीनंतर अध्यक्षपदी उरूण (ता. वाळवा ) येथिल रमेश आनंदराव वडे यांची , तर उपाध्यक्षपदी जत येथील शाकीदाबी पीरसाहेब शेख यांची बिनविरोध निवड झाली.

२०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीकरिता झालेलया संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व संचालक बिनविरोध निवडून आले. जिल्ह्याधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहायक निबंधक संभाजीराव पाटील यांनी काम पाहिले . नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्ह्यधिकारी काकडे यांच्याहस्ते करण्यात आला. स्वागत कार्यकारी संचालक ॲड. चिमण डांगे यांनी केले. बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश बिर्जे यांनी आभार मानले .