शुबमनच्या नेतृत्वात टीम इंडियाची पराभवाने सुरुवात

टीम इंडियाला शुबमन गिल याच्या नेतृत्वातील आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यातील पहिल्या डावात पावसाने तब्बल 5 वेळा खोडा घातला. त्यामुळे हा सामना 26 ओव्हरचा खेळवण्यात आला. भारताने 9 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार विजयासाठी 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 21.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह या मालिकेत विजयी सलामी देत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. तसेच ऑस्ट्रेलियाचा हा पर्थमधील पहिलावहिला एकदिवसीय विजय ठरला.