ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाने भारताला 18.4 ओव्हरमध्ये 125 रन्सवर गुंडाळलं. टीम इंडियात आठव्या स्थानापर्यंत बॅटिंग करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात टीम इंडियाकडून किमान 150-160 धावांची अपेक्षा होती. मात्र भारतीय फलंदाजांनी घोर निराश केली. भारताचे 3 फलंदाज आले तसेच परत गेले. तर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच 10 पेक्षा अधिक धावा करता आल्या. ओपनर अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा या जोडीने केलेल्या भागीदारीमुळे भारताला 120 पार मजल मारता आली. आता भारतीय गोलंदाज 125 धावांचा बचाव करत चमत्कार करणार की ऑस्ट्रेलिया पहिला विजय मिळवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
अभिषेक-हर्षितने लाज राखली, ऑस्ट्रेलियासमोर 126 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
