‘या’ सवयी तुमच्या मेंदूला नुकसान पोहोचवतात !

सतत अंधारात राहिल्याने मेंदूतील सेरोटोनिन या आनंद देणाऱ्या हार्मोनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मन उदास वाटू लागते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. दीर्घकाळ अंधारात राहिल्याने मेंदूची ऊर्जा घटते आणि थकवा, चिडचिड किंवा निराशाची लक्षणे दिसू शकतात. दिवसभर नकारात्मक बातम्या ऐकल्याने मनावर ताण वाढतो आणि मेंदू सतत भीती, असुरक्षितता आणि चिंतेच्या अवस्थेत राहतो. अशा बातम्यांमुळे स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कॉर्टिसॉलचे प्रमाण वाढते, ज्याचा परिणाम झोप, मूड आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो.

हेडफोनचा आवाज पूर्ण ठेवणे केवळ श्रवणशक्तीसाठी हानिकारक नसून, मेंदूतील न्यूरॉन म्हणजेच संदेशवाहक पेशींवरही गंभीर परिणाम करू शकते. सतत तीव्र आवाजामुळे कानातील स्नायूंना आणि मेंदूतील आवाज प्रक्रिया करणाऱ्या भागाला ताण येतो. सामाजिक वेगळेपणामुळे म्हणजेच लोकांपासून दूर राहिल्याने मेंदूतील संवाद आणि भावना नियंत्रित करणारे भाग हळूहळू कमकुवत होतात. सतत एकटेपणात राहिल्याने मेंदूतील ऑक्सिटोसिन आणि डोपामिन सारख्या आनंददायी रसायनांचे प्रमाण घटते. मोबाईलचा अतिवापर मेंदूला सतत उत्तेजित ठेवतो आणि लक्ष विचलित करतो.

सतत नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया आणि व्हिडिओजमुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही, ज्यामुळे लक्ष केंद्रीत ठेवण्याची क्षमता कमी होते. जास्त साखर खाल्ल्याने मेंदूतील स्मृती आणि शिकण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ शकते. सतत साखरयुक्त अन्न सेवन केल्यास मेंदूतील न्यूरॉन्स आणि त्यांच्यातील संपर्क कमजोर होतो, ज्यामुळे लक्ष केंद्रीत ठेवणे आणि माहिती साधणे कठीण होते. दिवसभर हालचाल न केल्याने शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो आणि मेंदूकडे पुरेसे ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते, लक्ष केंद्रित करणे कठीण होते आणि मानसिक थकवा वाढतो.

झोपेच्या वाईट सवयी म्हणजे अनियमित वेळेस झोपणे, पुरेशी झोप न घेणे किंवा रात्री उशिरा झोपणे, मेंदूतील टॉक्सिन्स काढण्याची नैसर्गिक प्रक्रिया रोखतात. यामुळे मेंदूची साफसफाई नीट होत नाही, न्यूरॉन्सवर ताण येतो आणि लक्ष, स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टता कमी होते.सतत थकवा आणि झोपेचा अभाव मेंदूला थकवतो आणि निर्णय घेण्याची क्षमता हळूहळू कमी करतो. झोपेच्या अभावामुळे मेंदूत स्नायूंच्या पुनर्निर्माणाची आणि स्मृती साठवण्याची प्रक्रिया प्रभावित होते. यामुळे लक्ष केंद्रीत ठेवणे कठीण होते. व्यायामाचा अभाव मेंदूतील नवीन पेशी निर्माण होण्याची प्रक्रिया हळूहळू मंदावतो. नियमित हालचाल न केल्याने मेंदूतील न्यूरोजेनेसिस कमी होते, ज्याचा परिणाम स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिकण्याच्या क्षमतेवर होतो. तसेच रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे मेंदूकडे पुरेसे ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचत नाहीत.