मुलतानी माती त्वचेसाठी एक नैसर्गिक वरदान मानली जाते. ती आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स, टॅनिंग आणि डाग कमी करण्यास मदत करतं. याशिवाय मुलतानी माती लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि आपला चेहरा ताजेतवाने दिसून येतो. बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सपेक्षा मुलतानी माती सुरक्षित असते. ती त्वचेला कोणतेही दुष्परिणाम न करता सौंदर्य टिकवून ठेवते. ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे त्यांनी गुलाबपाण्यासोबत मुलतानी माती मिसळून एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हातांनी लावून 15 मिनिटांनी धुवा. यामुळे चेहरा स्वच्छ आणि फ्रेश दिसून येतो. तेलकट त्वचेसाठी हळद आणि मुलतानी मातीचा फेसपॅकही उपयुक्त आहे. दोन चमचे मुलतानी माती आणि चिमूटभर हळद पाण्यात मिसळा. हा फेसपॅक 15 मिनिटं ठेवून नंतर धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यवरील पिंपल्स आणि दाणे कमी होतील. कोरड्या त्वचेसाठी काकडीचा रस आणि मुलतानी माती मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर 10 मिनिटं ठेवून नंतर धुवा. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये थोडी कॉफी आणि एक चमचा मध मिसळून फेसपॅक तयार करा.
तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी वापरा ‘हा’ फेसपॅक
