विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयामुळे इचलकरंजी शहरातील काही राजकीय पक्षांचे शटर डाऊन झाले आहेत. आता मी आणि प्रकाश आवाडे मिळून केवळ इचलकरंजीतच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविणार आहोत. याच सांघिक विजयाच्या बळावर आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुका कमळ चिन्हावर लढविणार आहोत.
इचलकरंजी महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक भाजपचे असतील. असे प्रतिपादन हाळवणकर यांनी भाजप शहर कार्यालयात नूतन आमदार राहुल आवाडे यांच्या सत्कार समारंभप्रसंगी केले.यावेळी हाळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आमदार आवाडे यांचा शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार झाला. भाजप शहर अध्यक्ष अमृत भोसले, ताराराणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांचाही सत्कार झाला.
आवाडे म्हणाले, ‘आता आपल्याला थांबायचे नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात कमळ फुलवायचे असून भाजप अधिक भक्कम करायचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांशी समन्वय साधून जोमाने कार्यरत होऊया.