सोमवारपासून सुरू होणार आयजीएममध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायलेसीस सुविधा

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात कामानिमित्त कामगार वर्ग येऊन स्थायिक झालेला आहे. कारखान्याची संख्या प्रमाणात आहे. इचलकरंजी शहरात अनेक सेवासुविधा उपलब्ध आहेत. इचलकरंजी शहर परिसरासह हातकणंगले व शिरोळ तालुका आणि सीमावर्ती भागातील नागरिकांनी आधारवड असलेले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होत आहे.

माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच पाठपुराव्यात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत… त्याच अनुषंगाने याठिकाणी डायलेसीस सेंटर आणि विविध ऑपरेशन थिएटर करण्यात आली आहेत. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट देऊन पाहणी करत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते आणि आमदार आवाडे यांच्या उपस्थितीत डायलेसीस सेंटर व आदर्श ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन करण्यात आले होते.


इचलकरंजी, ये इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील डायलेसीस सेंटर व आदर्श ऑपरेशन थिएटरचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. सोमवार, ता. १३ जानेवारी पासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डायलेसीस सुविधा सुरु करण्यात येत आहे.