हरमनप्रीत कौरने आता कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा; WC जिंकल्यानंतर दिग्गज खेळाडूची मागणी

भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडावं अशी मागणी करण्यात आली आहे. माजी कर्णधार शांथा रंगास्वामी यांनी ही मागणी केली आहे. ऐतिहासिक विजयानंतर हे बोलणं कठोर वाटेल, मात्र हितासाठी तिने कर्णधारपद सोडावं असं त्यांनी म्हटलं आहे. पीटीआयशी बोलताना रंगास्वामी यांनी कर्णधारपद सोडणें 36 वर्षीय हरमनप्रीतसाठी फायदेशीर ठरेल, जी फलंदाज आणि फिल्डर म्हणून संघासाठी अमूल्य आहे असं मत त्यांनी मांडलं आहे. संघाचं दीर्घकालीन भविष्य लक्षात घेऊन हा बदल करावा लागेल असं त्यांनी सांगितलं आहे. पुढील एकदिवसीय विश्वचषक 2029 मध्ये होणार आहे, तर टी-20 पुढील वर्षी यूकेमध्ये होणार आहे.

२९ वर्षांची स्टार सलामीवीर स्मृती मानधना ही नवीन कर्णधार होईल हे स्पष्ट आहे असंही त्यांनी म्हटलं. “याला फार उशीर झाला आहे. कारण हरमन, एक फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून, हुशार आहे. हो. पण रणनीतिकदृष्ट्या, ती कधीकधी अडखळू शकते. मला वाटतं की जर तिच्यावर कर्णधारपदाचा भार नसेल तर ती अधिक योगदान देऊ शकते. पहा, जेव्हा अशा यशानंतर (विश्वचषक विजय) परत खेळतो तेव्हा ते चांगल्या पद्धतीने घेतलं जात नाही. परंतु भारतीय क्रिकेटच्या हितासाठी आणि हरमनच्या स्वतःच्या हितासाठी, मला वाटतं की ती कर्णधारपदाच्या भाराशिवाय फलंदाज म्हणून बरंच काही योगदान देऊ शकतं,” असं ती म्हणाली.

“तिच्याकडे अजून तीन ते चा वर्षांचा खेळ शिल्लक आहे. कर्णधारपदी नसल्यास तिला ते शक्य होईल. स्मृतीला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार केलं जाईल. तुम्हाला भविष्यातील वर्ल्डकपसाठीही तयारी करावी लागेल,” असं त्यांनी सांगितलं आहे.

त्यांनी रोहित शर्माचंही उदाहरण दिलं, जिथे निवडकर्त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाच्या फायद्यासाठी दूर नेलं. ऑस्ट्रेलियासारखे वर्चस्व गाजवण्यासाठी भारताला गोलंदाजीच्या आघाडीवर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं. यादरम्यान त्यांनी काही मुद्देही मांडले.

आमच्या काळात फलंदाजी हा कमकुवत दुवा असायचा. आता फलंदाजी स्थिर दिसत आहे, पण गोलंदाजी ही चिंतेची बाब आहे. क्षेत्ररक्षणही खूप चांगले असू शकते,” असं सांगत त्यांनी आरसा दाखवला.

“ऑस्ट्रेलियाचा पराभव फक्त त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी नसल्याने झाला. मी म्हणेन की पाकिस्तान आणि बांगलादेशकडे चांगले गोलंदाजी होती. फलंदाजांनी आपल्यासाठी काम केलं,” असं त्यांनी म्हटलं.