ईश्वरपुरच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीस एकत्र भेटल्याचे फोटो व झालेले चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देवून वाळवा तालुक्यातील हुबालवाडी येथील एकाने तिला लॉजवर नेवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.

ही घटना जून २०२४ ते दि. १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली.

याप्रकरणी अनंतराज जयकर शिंदे याच्याविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही मुलगी येथील एका कॉलेजमध्ये सन २०२४ मध्ये अकरावीत शिकत होती. ती १७ वर्षे ९ महिन्यांची आहे. ती अधून-मधून हुबालवाडी येथे नातेवाईकाकडे जात होती. ती आईचा मोबाईल वापरत होती. दरम्यान शिंदे याने इन्स्टाग्रामवर तिची ओळख वाढवली.

मार्च २०२५ मध्ये शिंदे याने पीडित मुलीस मोटारसायकलवरुन येलूर येथील साईराज लॉजिंग व रिसॉर्टवर नेले. येथील एका खोलीत पीडित मुलगी विरोध करीत असतानाही जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध केले.

त्यानंतर पुन्हा आठ ते दहा दिवसांनी आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवून पुन्हा तिला घेऊन येलूर येथेच घेवून गेला. पुन्हा शारीरिक संबंध केले. तुझ्यासह तुझ्या आई-वडिलांना ठार मारेन अशी धमकी देत होता. त्यामुळे या मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेवून शिंदे याच्या विरुद्ध बर्दी दिली.