आष्टा, शिवशक्ती नागरी सह. पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. चालू आर्थिक वर्षात संस्थेला ३२ लाख रुपये नफा झाला असून सभासदांना १२ टक्के लाभांश देणार आहोत, अशी घोषणा चेअरमन अभिजीत वग्यानी यांनी केली.
यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजय पाटील, माणिकराव पाटील, व्हा. चेअरमन कृष्णराव कुंभार, धन्यकुमार पाटील, दिलीपराव वग्यानी, पीपल्स बँकेचे चेअरमन बबन थोटे, विराज शिंदे, अनिता वग्यानी, सरोजिनी शिंदे, ज्योती वग्यानी हे प्रमुख उपस्थित होते. संस्थापक चेअरमन अशोकराव वग्यानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. अभिजीत वग्यानी म्हणाले, स्व. रावळाप्पा कुंभार व स्व.
अशोकराव वग्यानी यांनी घालून दिलेल्या तत्त्वानुसार संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्थेकडे सुमारे २८ कोटी रुपयांच्या ठेवी असून अठरा कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. सभासदांना १२टक्के लाभांश देणार आहोत. लवकरच समडोळी येथे तिसरी शाखा सुरु करणार आहोत. यावेळी माणिकराव पाटील, धन्यकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विद्या लांडे, आसमा तहसिलदार, कौशिक वग्यानी यांचे सत्कार झाले. यावेळी सचिन चौगुले, किरण मुळीक, जयदीप थोटे, महेश गायकवाड, माजी नगरसेवक जगन्नाथ बसुगडे उपस्थित होते. श्रद्धांजली वाचन धनाजी गायकवाड, नोटीस वाचन सचिव सुरेश कुंभार, तर अहवाल वाचन अभिजीत वग्यानी यांनी केले. संयोजन किरण मुळीक यांनी तर सूत्रसंचालन संदिप तांबवेकर यांनी केले. सभेस सर्व सभासद कर्मचारी उपस्थित होते.
