उद्या २४ नगरपरिषदांसाठी होणार मतदान

माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी, राजकीय वर्तुळाचे लक्ष
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी याचिकाकर्ते अंजली दिघोळे राठोड आणि आशुतोष राठोड स्वतः उच्च न्यायालयात उपस्थित राहणार असून, सत्र न्यायालयाचा शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल कायम राहावा यासाठी ते जोरदार युक्तिवाद करणार आहेत. दरम्यान, नाशिक पोलिसांचे एक पथक काल रात्रीच मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. उच्च न्यायालयातून कोकाटेंना दिलासा मिळतो की त्यांची अडचण वाढते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपाचा सांगली जिल्ह्यावर”राग”, फसवणूक करणारा पक्ष – खासदार विशाल पाटील यांचा आरोप
भाजपाचा सांगली जिल्ह्यावर राग आहे, सांगली जिल्ह्यासाठी भाजपा कोणताही निधी देणार नाही,फसवणूक करणारा पक्ष असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. दहा वर्ष भाजपाचे खासदार होते,त्यावेळी निधी का ? नाही दिला,त्यामुळेच त्या खासदारांनी भाजप सोडली, असा आरोप देखील विशाल पाटलांनी केला आहे.नाशिक – माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
नाशिक – माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोकाटेंच्या विरोधातील याचिकाकर्ते अंजली दिघोळे राठोड आणि आशुतोष राठोड हे उच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. उच्च न्यायालयात देखील कोकाटेंच्या याचिकेला ते आव्हान देणार आहेत. राठोड दांपत्य उच्च न्यायालयात युक्तिवाद करणार असून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील निकाल कायम रहावा यासाठी बाजू मांडणार आहेत.

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आजच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.मीरा-भाईंदरमधील इमारतीत शिरला बिबट्या, 3 जखमी
मीरा-भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील एका इमारतीत बिबट्या शिरला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवाने हे घटनास्थळी पोहोचले आहेत. बिबट्याचा वापर मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे..