सोलापूर जिल्ह्यासाठी गुड न्यूज! उजनीसह ‘या’ पाच मंदिरांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर

सध्या सरकारकडून अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर केले जात आहेत. जेणेकरून विकासकामांना वेग येईल. आध्यात्मिक पर्यटनात सोलापूर जिल्ह्याला असलेली मोठी संधी साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पाऊल टाकले आहे. राज्य शासनाच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातून जिल्ह्यातील पाच मंदिरांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.या निधीतून कोणती कामे करावीत, यासाठीचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने तयार केला जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा आराखडा १५ दिवसांत प्राप्त होणार आहे. या आराखड्यानंतर या कामांसाठी टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे. टेंडर प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.


या पाच मंदिरांचा समावेश

सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर

सिद्धेश्वर मंदिर, माचणूर, ता. मंगळवेढा

नागनाथ मंदिर, वडवळ, ता. मोहोळ

कमलादेवी मंदिर, करमाळा

शिवसृष्टी व शिव पार्वती मंदिर, अकलूज, ता. माळशिरस