आशियाई स्पर्धेसाठी मनिष यादवची निवड

 राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा पॉवरलिफ्टर मनिष विजय यादव (बनेवाडी) याने मेहसाना (गुजरात) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग आणि डेडलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. त्याची नेपाळ येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांचे मनिष यादव यास पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत आहे. आ. जयंतराव पाटील, प्रतिक पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. मनिष याने मेहसाना येथे १२० किलो गटात पॉवरलिफ्टिंग आणि डेड लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याने गेल्या महिन्यात उरण (मुंबई) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. मनिष हा राजारामबापू पाटील इनडोअर स्टेडियममधील व्यायाम शाळेत सराव करीत आहे. त्यास हर्षद बारी यांचे मार्गदर्शन लाभते.