राजस्थानमधील कोटा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील एका मिरवणुकीदरम्यान अनेक मुलांना विजेचा धक्का बसला. या मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजस्थानमधील कोटा येथे शुक्रवारी हा प्रकार मोर आला. कुन्हाडी थर्मल चौकाजवळून जाणाऱ्या महाशिवरात्री निमीत्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत करंट पसरून १२ पेक्षा अधिक मुलांना धक्का बसला. विजेचा धक्का लागून १४ मुलांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक मुलांच्या हात-पायाला इजा झाली असून सर्वांवर तात्काळ उपचार करण्यात आले.या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला देखील रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमी मुलांची प्रकृती जाणून घेतल्यानंतर सर्व मुलांचे आरोग्य व्यवस्थीत राहावे यासाठी डॉक्टरांची टीम कार्यरत असल्याचे सांगितले.
तर एका मुलाची प्रकृती गंभीर असून खूप लहान मुले आहेत. बालकांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू नये, अशा सूचना रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास मुलांनाही रेफर करून उत्तम उपचार दिले जातील.