सांगोल्यात मोबाईल शॉपीवर मोठी चोरी; ३.८८ लाखांचा मुद्देमाल गायब

अज्ञात चोरट्यांने मोबाईल शॉपी दुकानचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील ३ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल संच चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी सांगोला शहरात उघडकीस आली.

सत्यवान वसंत इंगवले (रा. मेडशिंगी)यांचे सांगोला-मिरज रोडवर मोबाईल दुकान आहे. रविवारी रात्री ९ वा. च्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानावरील पत्रा उचकटलेले दिसून आले.

दुकानाचे निरीक्षण केले असता दुकानातील विविध कंपन्यांचे ३ लाख ८८ हजाराचे मोबाईल चोरून नेल्याबाबत गुन्हा नोंद केला आहे.