शिराळा औद्योगिक वसाहती मधील तेल निर्मिती करणाऱ्या कारखान्यास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सदर घटना बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. विश्वास साखर कारखाना व ईश्वरपूर येथील अग्रिशामक दलाच्या तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील औद्योगिक वसाहती मधील विलास बजरंग खोत यांची गुरुकृपा रिनोबल एनर्जी ही प्लास्टिकपासून फायरोसिसी ऑईल तयार करणारी कंपनी आहे. याठिकाणी पाच ते सहा कामगार कामाला असतात.आज दुपारी अचानक आग लागली. यावेळी येथील कामगार पळून बाहेर पडले. यामुळे जीवित हानी टळली.
या आगीमध्ये कच्चा माल, यंत्रसामुग्री, जेसीबी, पत्र्याचा शेड आदी जळून खाक झाली. घटनास्थळी नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, नगरसेवकराजसिंह पाटील, नगरसेवक अवधूत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सागर बरुटे, श्रीराम नांगरे पाटील यांनी घटनास्थळी धाव शिराळा शहरापासून औद्योगिक वसाहत ही साधारण ४ किलोमीटर आहे. परंतु आगीचे असे गंभीर प्रकार घडत असतानाही एमआयडीसी ची स्वतंत्र अशी अग्रिशमन यंत्रणा उपलब्ध नाही ही शोकांतिका आहे.
एम आय डी सी ची १९९० साली स्थापना होऊनही यासाठी कुठेच पाठपुरावा झालेला दिसत नाही. तसेच शिराळा नगरपंचायतीचा अग्रिशमन बंब अजूनही धूळखात पडून आहे. त्यासाठी ९० लाखांचा खर्च झाला आहे. अग्निशमन बंबासाठी सहा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज असताना इथे शिडी पकडायलाही मनुष्यबळ नाही ही बस्तुस्थिती आहे. नव्या कारभाऱ्यांनी यासाठी पाठ्पुरावा करून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
