सोन्याची सर्वात मोठी झेप, 10 ग्रॅमचा भाव थेट….आता खिसा होणार रिकामा !

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव प्रचंड वाढत आहे. आत सोनं थेट दीड लाखांच्याही पुढे गेले आहेत. तर सोन्याचा भावही साडे तीन लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. दरम्यान रविवारी गोल्ड मार्केट बंद असते. सोन्याचा सध्याचा भाव पाहता ते सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्याचे म्हटले जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव थेट 157310 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात हाच भाव थेट 4967.41 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. सोन्यासोबतच चांदीचाही भाव चांगलाच वाडला आहे.राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 157310 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचली तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 144210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तीन शहरांत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 144060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 157160 रुपये प्रति 10 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्यासोबतच चांदीचा भावही चांगलाच वाढला. 24 जानेवारी रोजी चांदीचा भाव 340100 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला. परदेशी बाजारात चांदीचा भाव 99.46 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.