सोलापुरात अवकाळीने शेतकरी पुन्हा संकटात….

हवामानाच्या बदलत्या या वातावरणामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना हा करावा लागत आहे. चांगले आलेले पीक हे अवकाळी पावसामुळे नुकसान कीत जात आहे. मंगळवारी सोलापुरात सकाळी तसेच दिवसभरात वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे द्राक्ष, कांदा व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकरी हा गेल्या वर्षापासून निसर्गामुळे तसेच सरकार या दोघांमुळे खूपच घायाळ झालेला आहे. अवकाळी पाऊस हा कधीही पडत असल्याने शेतकऱ्यांच्या आलेल्या पिकांचे खूपच नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.