दीड लाखांचे दागिने लंपास!

आजकालच्या या काळात आपल्याला अनेक फसवणुकीच्या घटना वेळोवेळी ऐकायला मिळतात. तसेच पाहायला देखील मिळतात. अशीच घटना सोलापूर जिल्ह्यात घडलेली आहे.

सावित्री नागनाथ बोगा (रा. आनंद विणकर सोसायटी उत्तर सदर बजार) या आपल्या सुनेसोबत भांडी घासत बसल्या असताना दोन अनोळखी व्यक्ती येऊन त्यांना सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगितले आणि त्यामुळे त्यांनी देखील सोन्याचे गंठण, मनी मंगळसूत्र, कानातील कर्णफुले असे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले.

या अनोळखी व्यक्तींनी काही हालचाली करून सोन्याची दागिने पॉलिश करताना ते दागिने स्वतःकडे ठेवून त्या ऐवजी प्लास्टिक पिशवीत कागदात लहान दगड गुंडाळून सावित्रीला दिले.

काही वेळानंतर कागद उघडून पाहिला असता त्यामध्ये दागिने नव्हते तर दगड होते. याबाबत फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक माळी पुढील तपास करीत आहेत.