आज राज्यातील 8 महानगरपालिकांचे महापौर ठरणार

परीक्षा पे चर्चा २०२६ : पंतप्रधान मोदींनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२६ अंतर्गत नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियममध्ये देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेचा ताण, भीती आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. परीक्षा हा आयुष्याचा अंत नसून ती केवळ एक पायरी आहे, असा मंत्र मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला.

अमरावती महानगरपालिकेच्या ठरला महापौर
महायुती कडून श्रीचंद तेजवानी; तर काँग्रेस कडून संजय शिरभाते महापौर पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात. उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमान कडून सचिन भेंडे तर काँग्रेस कडून लुधना तनवीर निवडणुकीच्या रिंगणात, पहिल्या सव्वा वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या सव्वा वर्षासाठी भाजपचे आशिष अतकरे यांची नावे. रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टी सोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये सहभागी. अमरावती महानगरपालिकेला आज लाभणार सतरावे महापौर आणि उपमहापौर. तब्बल चार वर्षानंतर आज अमरावती महानगरपालिकेमध्ये बसणार महापौर

मनपाच्या 227 कोटींच्या मलनिस्सारण प्रकल्पास मंजुरी
१२० कोटींच्या नवीन तर १०७ कोटींच्या जुन्या मलवाहिका बदलणार. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानांतर्गत मलनिस्सारण प्रकल्पांना राज्य शासनाची प्रशासकीय मंजुरी. प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीप्रदूषणमुक्तीच्या प्रयत्नांना मिळणार बळ

काँग्रेस नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक
काँग्रेस नवनिर्वाचित नगरसेवकांचा सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करत महत्त्वाची बैठकय बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदर्भातील सर्व नियुक्त्यांचे अधिकार प्रदेशाध्यक्षांना देण्याचा ठराव. मुंबईच्या टिळक भवनात ठराव; मंजूर जिल्हा