नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN) शेअरमध्ये बुधवारी तुफान आले. एसजेव्हीएन लिमिटेडचा शेअर बुधवारी BSE वर 6 टक्क्यांनी वधारला. हा शेअर या उसळीनंतर 77.29 रुपयांवर काल बंद झाला. तर आज बाजार बंद होण्यापूर्वी सुद्धा शेअरमध्ये उसळी दिसली. हा शेअर आज 1.14 टक्क्यांच्या तेजीसह 78.26 रुपयांवर व्यापार करत होता. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरच्या तिमाहीमध्ये एसजेवीएन लिमिटेडचा फायदा 50 टक्क्यांनी अधिक वाढला. नवरत्न कंपनीने शेअरधारकांना डिव्हिडंड, लाभांश देण्याची घोषणा केली आहे. एसजेव्हीएनचे शेअर 52 आठवड्याच्या उच्चांकावर 107.50 रुपयांवर होते. कंपनीचा शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 68.17 रुपये आहे.
नवरत्न कंपनीला 224 कोटींचा नफा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडला चालू आर्थिक वर्षात, डिसेंबर तिमाहीत मोठा फायदा झाला. नफा 50.6 टक्क्यांनी वाढून 224.4 कोटी रुपये झाला. एका समान वर्षाच्या कालावधीत कंपनीला 149 कोटींचा नफा झाला. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत एसजेव्हीएन लिमिटेडचा (SJVN Limited) महसूल वार्षिक आधारावर 61.3 टक्क्यांनी वाढला. तिसर्या तिमाहीत कंपनीचा महसूल 1082 कोटी रुपये होता. एका वर्षांपूर्वीच्या समान कालावधीत कंपनीचा महसूल 671 कोटी रुपये होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2025 च्या तिमाहीत एसजेव्हीएनचा इबिट्डा 57 टक्क्यांनी वाढून 738 कोटी रुपयांवर पोहचला. एक वर्षांपूर्वी समान कालावधीत कंपनीचा महसूल 470 कोटी रुपये होता.
गुंतवणूकदारांना मिळणार लाभांश
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Limited) बोर्डाने आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रत्येक शेअरवर 1.15 रुपयांचा डिव्हिडिंड, लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने अंतरिम लाभांश देण्याची रेकॉर्ड डेट 20 फेब्रुवाारी 2026 निश्चित केली आहे. याशिवाय एसजीव्हीएन लिमिटेडच्या बोर्डाने बाजारातून 1000 कोटींचा निधी जमावण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीने हा फंड अनसिक्योर्ड, रेटेड, टॅक्सेबल, रिडीमएबल, नॉन-कन्वर्टिबल, नॉन-कम्युलेटिव डिबेंचर्स यामाध्यमातून जमा करण्याचे ठरवले आहे.
SJVN Limited च्या शेअरमध्ये तुफान
SJVN Limited च्या शेअरमध्ये तुफान आले आहे. गेल्या 5 वर्षात कंपनीने 182 टक्क्यांहून अधिकची घोडदौड केली आहे. नवरत्न कंपनीचा शेअर 12 फेब्रुवारी 2021 रोजी 27.35 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर आज गुरुवारी 12 फेब्रुवारी 2026 रोजी 78.26 रुपयांवर होता. गेल्या पाच वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 186.67 टक्क्यांचा मोठा परतावा दिला आहे. तर एका वर्षाचा विचार करता कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची घसरण दिसली. गेल्या 6 महिन्यात कंपनीचा शेअर 17 टक्क्यांनी घसरला. तर या वर्षाचा विचार करता हा शेअर 3.43 टक्क्यांनी उसळला आहे.
