अजितदादांनी विमानाने जाण्याचा निर्णय का घेतला? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे नाव घेत रोहित पवारांचा मोठा दावा काय?

अजित पवार यांची अकाली एक्झिट राज्यातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलेली आहे. त्यातच हा विमान अपघात आहे की घातपात यावरून मोठा गदारोळ उठला आहे. आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या दोन पत्रकार परिषदेत या सर्व घटनाक्रमावर सविस्तर भाष्य केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया आणि वक्तव्य केली. त्यामुळे संशयाचा धूर अधिक गडद होत चालला आहे. अगदी थोड्यावेळापूर्वी रोहित पवार यांनी दिल्लीत माध्यांशी संवाद साधला. पुन्हा एकदा याविषयावर भूमिका मांडली आहे. त्यामुळे गजहब उडाला आहे.

विमान अपघातापूर्वीचा घटनाक्रम काय?

जर 27 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पुण्याला कारने गेले असते तर पुण्याला पोहचले आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला गेले असते. तर मग ही दुर्दैवी घटना घडली नसती. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर मी अगोदर बोललो आहे. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुणाचा फोन आला हे लोकांना आता कळालं आहे. फाईलवर मुद्दामहून तिथल्या तिथं स्वाक्षरी झाली पाहिजे अशी एका नेत्याने इच्छा व्यक्त केली. दादांनी ती स्वाक्षरी केली आणि संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचं विमानाने जाण्याचा प्लॅन झाला असता तर 26 तारखेला संध्याकाळी अथवा 27 तारखेलाच दुपारी विमानाचं बुकिंग झालं असतं. जी काही क्रमवारी ती मी बोलून दाखवली. मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. माझं प्रामाणिक मत आहे की या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी. 27 तारेखापासून ते 28 तारखेपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे. तर जे प्रमुख पायलट होते. ते कुणाला भेटले. महिनाभर आणि दोन महिन्याभर कुणाच्या संपर्कात होते, कुणाला भेटले होते याची सु्द्धा चौकशी व्हायला हवी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

प्रफुल्ल पटेल यांचा फोन, तटकरे हजर

प्रमोदराव हिंदूराव यांनी जी माहिती दिली, याचा अर्थ मी कुठंही खोटं बोललो नाही हे समोर येत आहे. जसं की 27 तारखेला तटकरे यांनी स्वतः सांगितले की तिथं स्वतः आलो, उशीरापर्यंत थांबलो. दुसर्‍या बाजूला प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला असे हिंदूराव सांगत आहेत. आणि मग उशीरा झाला. याचा अर्थ दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे. एका पॉलिटिकल कन्स्लटन्शीबाबत तिथं चर्चा झाली. योगायोग असा आहे की या पॉलिटिकल कन्स्टलन्शीने विमान सुद्धा विकत घेतलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रक्ट कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका होती. कदाचित त्यामुळे वाद विवाद झाला. सुनील तटकरे हे त्यावेळी तिथं होते. त्यामुळे दादांना उशीर झाला. उशीर झाला म्हणून दादा गाडीने जाण्याऐवजी विमानाने गेले असे रोहित पवार म्हणाले.

नरेश अरोरा यांचे नाव समोर

नरेश अरोरा यांना केवळ सर्व्हे पुरते ठेवा. मी काही कन्स्टलन्शीच्या माध्यमातून पक्ष चालवत नाही असे दादा म्हणाले होते, या चर्चेवर रोहित पवार यांनी भावना व्यक्त केल्या. याविषयीची जी माहिती समोर येत आहे ती खरी आहे. आम्ही जेव्हा बारामतीमध्ये दादांसोबत होतो. त्यावेळी सुद्धा नरेश अरोरा यांच्या कन्स्टलन्सीच्या लोकांना दादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये झापत होते. 27 तारखेला सुद्धा नरेश अरोरा याचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रक्ट तसाच ठेवला पाहिजे, त्याला रक्कम द्यायला हवी अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची होती. 27 तारखेच्या बैठकीत तशीच भूमिका होती. पण अजितदादांची त्याविरोधात भूमिका होती असे रोहित पवार म्हणाले.

ब्लॅक बॉक्सचं कारण दिलं तर…

तर व्हीएसआर कंपनी ब्लॅक बॉक्स बंद ठेवत असते या दाव्यावर रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य केले. उद्या जर असं समोर आलं की विमान कंपनीचा ब्लॅक बॉक्स बंद होता तर मग माझ्या बोलण्यावर शिक्कामोर्तब होईल की दादांचा घातपात होता अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. तर सुनेत्रा पवार आणि मोदी यांच्या भेटीत अपघात की घातपात हा मुद्दा मांडला असेल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.