सांगोला आगारातून 29 ज्यादा बसेसची सुविधा

13 फेब्रुवारी, (हिं.स.)। सांगोला तालुक्यातून श्री मायाक्का देवीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त चिंचणी यात्रेसाठी जात असतात. यासाठी सांगोला आगारातून 29 ज्यादा बसेसची सुविधा पुरविण्यात आली होती

एकूण 112 फेऱ्यांमध्ये 4 हजार 34 प्रवाशांनी प्रवास केल्याने आगारास 8 लाख 10 हजार 463 एकूण उत्पन्न झाले. त्यापैकी 1 लाख 59 हजार 864 सवलत सोडता प्रत्यक्ष उत्पन्न 6 लाख 50 हजार 599 रुपयांचे निव्वळ उत्पन्न झाले आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवी-देवतांना जास्त महत्त्व दिले जाते. ज्याच्या त्याच्या सध्या चिंचणी या ठिकाणी असणाऱ्या श्री मायाक्का देवीची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली आहे. चिंचणी येथील मायाक्का देवी हे देवस्थान कर्नाटक राज्यामध्ये आहे. सांगोला येथून हे देवस्थान 150 कि.मी. लांब आहे. मागीलवर्षी यात्रा कालावधीमध्ये 40 गाड्यांच्या माध्यमातून 14 हजार 667 कि. मी. प्रवास केला. लालपरीने आगारास 9 लाख 56 हजार 163 रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले होते.