मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उन्हाचा चटका आता जाणून लागला आहे. राज्यातून थंडी गायब झाली असून सकाळच्या वेळी थोडासा गारठा जाणवतो. मात्र, राज्यातून थंडी गायब झाली ही वस्तूस्थिती असली तरीही प्रदूषण काही कमी होण्याचे नाव घेत नाही. मुंबईत आज प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे दिसतंय. वातावरणात धुळीचे कण आहेत. अंधूक अंधूक दिसत आहे. मुंबईतील वायू प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे. या वायू प्रदूषणामुळे हवा इतकी जास्त घातक बनली की, नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले. मास्क घातल्याशिवाय पर्याय राहिला नाही. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यासोबतच सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत आहे. प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत, असे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, मुंबईतील वाढलेले वायू प्रदूषण हा गंभीर मुद्दा नक्कीच बनले आहे.
राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आज राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे दिवसभर तापमानात चढउतार बघायला मिळेल. जेऊर येथे राज्यातील नीचांका तापमानाची नोंद झाली. जेऊर येथे 14.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
यासोबतच दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. मात्र, काही राज्यात असूनही कडाक्याची थंडी आहे तर काही राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात देशात तीन हंगाम सध्या बघायला मिळत आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 22 फेब्रुवारी 2026 रोजी केरळ आणि तामिळनाडूमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. हेच नाही तर यादरम्यान हिमाचल प्रदेशामध्येही पावसाचा इशारा देण्यात आला. मागील काही दिवसांपासून तामिळनाडूच्या काही भागात सतत पाऊस सुरू आहे. केरळमध्येही पाऊस हजेरी लावत आहे.
