वाळवा तालुक्यातील उपसरपंच अजित कदम यांची बिनविरोध निवड

कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या अजित कदम यांनी पेठनाका येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजपचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक यांनी अजित कदम यांचा सत्कार केला.


यावेळी माजी सरपंच रहिमशा फकीर, मारुती कदम, दिनकर कदम, बावाशा फकीर, जमीर पटेल, अभिजित कदम, गणेश वाडेकर, हारुण पटेल, संदीप सुतार, भगवान कदम, महादेव पवार, परवेश पटेल, चांद पटेल, रमजान पटेल, कुमार वायदंडे, नामदेव कदम, संतोष कदम उपस्थित होते.