माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा आणि सुरक्षित, स्वच्छ वातावरण मिळावे हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.
शहरात सगळीकडेच नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा, धूळमुक्त व दर्जेदार रस्ते, पुरेशी स्ट्रीट लाईट व्यवस्था, गटार व रस्त्यांची स्वच्छता तसेच डास निर्मूलन यावर विशेष भर देणार आहे. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांसाठी बगीचे, नाना-नानी पार्क आणि योगासन केंद्र उभारण्यास प्राधान्य देईन. विद्यार्थी संख्या मोठी असल्याने सुसज्ज अशी एक अभ्यासिका व नागरिकांसाठी आधुनिक वाचनालय उभारणार आहे. नियोजित मंडई उभारून लघु व्यावसायिकांना चालना देण्यावर माझा भर राहील. शहरातील वाहतूक व पार्किंग समस्यांवर ठोस उपाययोजना करून मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून स्थलांतरित होत असलेली बाजारपेठ पुन्हा सक्षम होईल. स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि प्रगत प्रभाग घडवणे हेच माझे व्हिजन आहे. नागरिकांच्या सहकार्याने सांगोला शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
”माझा प्रभाग, माझे व्हिजन” – सांगोला
