कोल्हापूर शहरात पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना (Kolhapur)उघडकीस आली आहे. बांधकामाच्या साईटवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केल्याप्रकरणी विशाल राजू वडर वय २५ याला राजारामपुरी पोलीस ठाणे यांच्या पथकाने अटक केली आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पालकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरात राजारामपुरी पोलीस हद्दीत (Kolhapur)एका बांधकामाच्या साईटवर ५ वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केला. या घटनेनंतर मुलीच्या वागण्या बोलण्यात कुटुंबियांना फरक जाणवू लागला. काल सकाळी चिमुरडी अस्वस्थ दिसत होती.
तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ संशयिताचा शोध घेतला. (Kolhapur)संतप्त झालेल्या पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
