पालकमंत्री हसन मुश्रीफ आजपासून जिल्ह्या दौऱ्यावर…

आज शुक्रवारपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अनेक कार्यक्रम या जिल्हा दौऱ्यामध्ये होणार आहेत . सायंकाळी चंदुर मधील विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. तसेच उद्या शनिवारी सकाळी 11 वाजता कसबा सांगाव येथील पंतप्रधान विश्वकर्मा योजना नोंदणी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ते साडेसहा वाजता कोल्हापुरातील गांधी मैदान येथे शिवगर्जना महानाट्यास उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता बिद्री येथे दत्ता मामा फराकटे शेती सेवा केंद्राचे उद्घाटला जाणार आहेत.

तसेच दुपारी तीन वाजता येते महासैनिक दरबार हॉल येथे महायुतीतील कार्यकर्त्यांच्या मेळावा होणार आहेत. सायंकाळी सात वाजता कागल नगर परिषदेच्या वतीने आयोजित शाहू व्याख्यानमालेस उपस्थित राहणार आहेत. गोकुळच्या वतीने कलश पूजन व सत्कार समारंभास उपस्थित राहणार असून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कागल येथील श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.