पंचगंगा पाणी पातळीत वाढ कोल्हापूरला महापूराची भीती! स्थलांतर सुरू…….

कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातून (Almatti Dam) आज शुक्रवारी (दि.२६ जुलै) २ लाख ६६ हजार ५८६ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. दरम्यान, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असला तरी कोल्हापुरातील पाणी पातळी वाढतच (Kolhapur Flood Updates) आहे.

दरम्यान, कोल्हापुरात पंचगंगा नदीने काल गुरुवारीच धोका पातळी ओलांडली होती. आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ४४ फूट ९ इंच इतकी होती. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे गुरुवारी खुले झाले.

धरणातून होणारा विसर्ग, दिवसभर सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि पंचगंगेने सकाळी ओलांडलेली धोका पातळी, नागरी वस्तीजवळ येत असलेले पाणी, यामुळे महापुराची भीती वाढत असून, पूरबाधित परिसरातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केले.