आज देशात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, 14 जानेवारील आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Price Today) 5800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Price Today) 6327 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,270 रुपये आहे. मुंबईत सोन्याचा दर 63,270 रुपये आहे. चेन्नईत सोन्याचा दर 58,450 रुपये आहे. यासोबतच, चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असून, आज चांदीची किंमत 76,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
आज सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीच्या किमतीत 500 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आज एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे. दिल्लीमध्येही चांदीच भाव सारखाच आहे. चेन्नईमध्ये आज चांदीचा दर 78,000 रुपये किलो आहे.
- पुणे -आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम
- नाशिक – 24 कॅरेट सोने 63300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- नागपूर – 24 कॅरेट सोने 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- कोल्हापूर- 24 कॅरेट सोने 62870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नवीन वर्षात सोन्याचा दर 70,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. चालू जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव यावर्षी 2024 मध्ये प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचेल, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल ने म्हटले आहे.
