तुम्हीही अयोध्येत फिरायला जाण्याचा विचार करतय का..

सध्या देशविदेशातील रामभक्तांनी प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची आस लागली आहे. अयोध्येतील  भव्य राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात राम लीला प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे. यादरम्यान सर्व भक्तांची मांदियाळी अयोध्येकडे जाताना दिसत आहे. फक्त राम भक्तच नाहीतर, उतर धर्मीय लोक आणि पर्यटकही अयोध्येकडे रवाना झाले आहे. तुम्हीही अयोध्येत जाण्याच्या विचारात असाल तर, तिथे तुम्ही कोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता, याबाबत जाणून घ्या.

उत्तराखंडच्या सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेले नैनिताल हे काही स्वर्गापेक्षा कमी नाही. हे उत्तराखंडचे असे एक हिल स्टेशन आहे, जिथे बहुतेक पर्यटक फिरायला आणि मजा करायला येतात. नैनीताल अयोध्येपासून 532 किमी अंतरावर आहे. नैनितालमध्ये तुम्ही नैनी तलाव, नैना देवी मंदिर, केव्ह गार्डन, टिफिन टॉप आणि हिमालयन व्ह्यू पॉइंट सारख्या ठिकाणांचा आनंद घेऊ शकता. ट्रेकिंगसोबतच, नैनितालमध्ये तुम्ही पॅराग्लायडिंगचाही आनंद घेता येईल.उंच टेकड्यांचे सौंदर्य, मनमोहक तलाव-धबधबे, देवदाराची झाडे आणि हिरवी गवताची मैदाने नैनितालच्या सौंदर्यात भर घालतात.  

अल्मोडा हे हिमालयाच्या सुंदर दऱ्यांमध्ये वसलेले एक सुंदर आणि मोहक हिल स्टेशन आहे. हे शहर भारतातील अनेक राज्यांमध्ये नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. अल्मोडा अयोध्येपासून फक्त 579 किमी अंतरावर आहे. उंच टेकड्या, तलाव-धबधबे, देवदाराची झाडे आणि गवताळ शेतांमुळे अल्मोडाचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे. निसर्ग सौंदर्य प्रेमींसाठी अल्मोडा स्वर्गापेक्षा कमी नाही. हे शहर सौंदर्यासोबतच सामाजिक उपक्रमांसाठीही प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, हायकिंग आणि पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता. 

पोखरा भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकांचंही आवडतं ठिकाण आहे. येथे भारतासह विदेशातील पर्यटकही भेट देतात. अयोध्या ते पोखरा हे अंतर सुमारे 352 किमी आहे. पोखरा नेपाळमधील निसर्गरम्य शहर आहे. हे सुंदर शहर अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य, मोहक तलाव, पर्वत शिखरे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पोखरा हनिमून डेस्टिनेशन म्हणूनही प्रसिद्ध आहे. 

समुद्रसपाटीपासून 208 मीटर उंचीवर वसलेले भरतपूर हे एक सुंदर शहर असून नेपाळमधील एक अतिशय आकर्षक आणि प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे सुंदर शहर अयोध्येपासून फक्त 306 किमी अंतरावर असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. भरतपूर हे काठमांडू आणि पोखरा नंतर नेपाळमधील तिसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. भरतपूर निसर्ग सौंदर्यासाठी ओळखलं जातं. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चितवन राष्ट्रीय उद्यानात तुम्ही सर्वोत्तम जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता.