आयोध्येतील सोहळ्यास कोल्हापूरातही निमंत्रण….



सगळेजण अगदी आतुरतेने २२ जानेवारीची वाट पाहत आहेत. आयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीमध्ये भगवान श्रीरामाच्या मूर्तीची २२ जानेवारीला प्रतिष्ठापना होत आहे. यानिमित्त देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निमंत्रण देण्यात येत आहे. या सोहळ्याला कोल्हापुरातील श्री गुरु रामचंद्र महाराज यादव मठाचे ह. भ. प. महादेव महाराज यादव यांना विश्व हिंदू परिषदेचे आयोध्यातील प्रतिनिधी संजय मुद्राळे व विजय शिंदे यांनी निमंत्रण पत्रिका दिली.

गावागावात कलश यात्रा देखील संपन्न होत आहेत. आयोध्येतील या सोहळ्याला कोल्हापुरातील निवडक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करणाऱ्या महादेव महाराज यादव यांचा समावेश आहे.